एक सर....!!!!

एक सर, मनामध्ये, शिरली आत, थेट थेट
एक सर, आतून आतून, थोडी थोडी wet wet
एक सर, खिड़कीमधून आत आत घुसत होती
एक सर, बाहेरून, "हाय ! बाय !" म्हणत होती
एक सर, मन होवून, तन सोबत, घेउन गेली
एक सर, तन घेउन, मला चिंब भिजवून गेली
एक सर, माझी-माझी, तुझी-तुझी, भांडत होती
एक सर, सावरत होती, बावरत होती, सांडत होती
एक सर, विजेसोबत रागारागात खाली आली
एक सर, तळहातावर, हसून ती माझी झाली
एक सर, धरणीसाठी घेवून आली एक पत्र
एक सर, भिजवून गेली, आतून आतून, सर्व गात्र
एक सर, निमूटपणे पाऊस होवून पडली खाली
एक सर, खाली पडून सुगंधुनच वर आली
एक सर, माझी होवून, तुझ्या गाली ओघळली
एक सर, तिच्यामुले, थोडी लाली, निखळली
एक सर, तुला मला, भास तुझा, भास माझा
एक सर, 'सय' झाली, माझ्या मनी, पाऊस तुझा
एक सर, जाता जाता, तुझी तुझी, होत जाते
एक सर, तुझ्यापरी, मनाच्याही आत जाते
.
.
.
:- अम्बरीश देशपांडे
"नाते शब्दांचे"